पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुरकुरीत मक्याची भजी (कॉर्न पकोडा) रेसिपी | घरच्या घरी बनवा झटपट आणि स्वादिष्ट कॉर्न कुरकुरीत भजे

इमेज
 कुरकुरीत मक्याची भजी (कॉर्न पकोडा) रेसिपी | घरच्या घरी बनवा झटपट आणि स्वादिष्ट कॉर्न कुरकुरीत भजे 📖 Full Blog पावसाळा असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, गरमागरम आणि कुरकुरीत भजी खाण्याची मजा काही औरच असते. त्यात जर भजी मक्यापासून तयार केलेली असतील, तर चव आणखी खास होते. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत मक्याची भजी म्हणजेच कॉर्न पकोडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ही रेसिपी बनवण्यासाठी मक्याचे कणीस, कांदा, लसूण, आले, बेसन आणि कन्फ्लावर यांसारखे सहज उपलब्ध होणारे साहित्य वापरले जाते. योग्य प्रमाणात मिश्रण तयार करून मध्यम गरम तेलात भजी तळल्यास बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्वादिष्ट भजी तयार होतात. 🥘 कुरकुरीत मक्याच्या भज्यांसाठी साहित्य - २ मक्याचे कणीस - २ कांदे - २ लसणाच्या कांड्या - १ छोटा तुकडा आले - ½ चमचा जिरे - ½ चमचा हळद - चवीनुसार मीठ - थोडीशी कोथिंबीर - ½ वाटी कन्फ्लावर - ½ वाटी बेसन पीठ - थोडासा ओवा - तळण्यासाठी आवश्यक तेवढे तेल 👨‍🍳 कुरकुरीत मक्याची भजी बनवण्याची कृती सर्वप्रथम दोन मक्याचे कणीस सोलून घ्या. मक्याचे दाणे काढून मिक्सरमध्ये घाला आणि अगदी बारीक पेस्ट...